अलिकडे, सुप्रियाला चांगली झोप लागणे फार कठीण जाऊ लागले होते. ती तासन् तास कूस बदलत बसे, पण तिला झोप लागत नसे. रात्र अशी अवघड गेल्यावर दिवसभर, पुन्हा आपल्याला आजही झोप नाही लागली तर काय होईल याची ती काळजी करित बसे. (आजची रात्रसुद्धा तेच घडले आणि मला झोप लागली नाही तर काय?) याचा परिणाम ती ज्या प्रकारे विचार करत असे त्यावर होऊ लागला. संपूर्ण दिवसभर तिला दमल्यासारखे वाटे ती निराश आणि चिडलेली असे. क्लासमध्ये लक्ष केंद्रित करणे हा तिच्यासाठी मोठाच टास्क असे. तिच्या झोप लागत नसल्याने आणि झोपेचे सर्व तंत्रच बिघाद्ल्याने ती खरोखरच उदास झाली होती.
प्रारंभखालीलपैकी एखादी गोष्ट तुम्हाला ओळखीची वाटते आहे का?
आपल्यापैकी अनेकांना विद्यार्थी असताना कधी ना कधी अशा समस्येला सामोरे जावे लागले असेल. जीवनातील अनेक बदल, अनेक टास्कमुळे येऊ घातलेल्या तणावपुर्ण गोष्टी (कधीच न संपणाऱ्या असाइनमेंट्स, परीक्षा), संभाषणातील अडचणी, किंवा तुम्ही ज्यासाठी उत्सुक असता ते इव्हेंट्स (सण!) सुद्धा. जर या सर्वामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर ते स्वाभाविक आहे.
कधी-कधी झोपेची समस्या ही तात्पुरती असू शकते आणि काही दिवसांनी परिस्थिती बदलेल आणि झोपेचा प्रश्न सुटेल. झोपेचे समस्या खुप दिवस राहण्याचीही शक्यता असते, जर तो प्रभावीपणे हाताळला गेला नाही. ( उदा. रात्रीची अपुरी झोप भरून काढण्यासाठी दिवसा झोप घेणे, अखेरीस तीच सवय होते.).
प्रभावीपणे सुरवात करण्यासाठी काही आठवडे झोपेची डायरी तयार करा. त्यातील रकाने भरल्यावर आणि तुमची झोपेची सवय कागदावर उतरविल्यावर तुम्हाला तुमच्या झोपेचा पॅटर्न समजण्यास मदत होईल आणि तुम्हाला झोप लाण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते आहे आणि कोणत्या गोष्टी त्यात बाधा आणीत आहेत हे समजेल. तुम्ही ही मर्यादा आखून घेऊन सुरुवात करू शकता.
| आठवड्यातील दिवस | सोमवार | मंगळवार | बुधवार | गुरुवार | शुक्रवार | शनिवार | रविवार |
|---|---|---|---|---|---|---|---|
| मी झोपण्यासाठी पलंगावर पडलो ती वेळ -- . | |||||||
| मला झोप लागण्यास अंदाजे -- मिनिटे लागली | |||||||
| मी --- तास झोपलो | |||||||
|
मला वाटते माझ्या झोपेचा दर्जा --- होता (स्केल १ ते ५) |
|||||||
| मला दिवसभर --- वाटले (उत्साही, विश्रांतीचा, चीडचिडे, अनुत्साही, अस्थिर, आनंदी, सावध, स्लीपी इत्यादी) | |||||||
पलंगावर जाण्यापूर्वी मी:
|
|||||||
| माझी झोप बिघडण्याची इतर कारणे (दिवसा एक छोटी झोप घेतली/ तिथे खूप गोंगाट होता/ विचारांची गर्दी झाली होती) |
तुमची खोली आणि पलंग तुम्हाला अनेक रात्री शांत झोप न लागण्याच्या निराशे बरोबर जोडले गेले असण्याची शक्यता आहे. तर तुमच्या सभोवतालचे वातावरण यशस्वीपणे झोप लागण्याशी पुन्हा जुळवून घेण्याची कल्पना करा. काही वर्तनांशी चिकटून हे करता येईल जसे:
ताण किंवा भीती हा चांगली झोप लागण्यातील मोठा अडसर ठरू शकतो. निरनिराळी रिलॅक्शेशन टेकनिक्स ज्यांची रेंज दीर्घ श्वसन, स्नायू शिथिल करणे यापासून ते ध्यान-धारणा (मेडीटेशन). यातील तुम्हाला कशाचा फायदा होतो आहे ते शोधा.
झोपेबद्दलच्या चुकीच्या कल्पना किंवा तुम्हाला भेडसावणारी इतर काही काळजी तुमची झोप अवघड करते. जेव्हा तुम्ही झोपेसाठी झगडत असता तेव्हा तुमच्या मनात काय चालले आहे त्याबाबत सतर्क रहा. निरुपयोगी श्रद्धेला आव्हान द्या आणि त्याचे नवे वास्तव स्वरूप शोधा उदा.,
इतर दिवसांप्रमाणे मी आजही रात्री झोपू शकणार नाही आणि उद्याचा दिवस मॅनेज करू शकणार नाही.
अधिक वास्तववादी विचार: शेवटी आज मी झोपू शकेन आणि जरी मी थकलो असेन तरी माझे पुढील दिवमी व्यवस्थित पार पाडेन.
झोपेची स्वच्छता पायाभूत लाईफस्टाईलच्या फॅक्टर्सशी संबंधित आहेत आणि ते झोपेच्या क्वलीटीशी निगडीत आहेत. त्यात खालील काही गोष्टींचा समावेश आहे:
मला आढळलेल्या सवयी ज्या मला झोपण्यासाठी व्यत्यय आणू शकतात:
ज्यावर काम करणे मी सुरु करणार आहे अशा गोष्टी:
मी काय करणार आहे:
मी प्रयत्न करणार असलेले आणि ज्याच्याशी चिकटून राहणार आहे ते झोपेचे माझे व्यक्तीगत रुटीन: